शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने जुना चंदूर रोड परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून विनापरवाना मद्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. दिपक अमृत पिणे (वय ४२), गणपती गुंडाप्पा चव्हाण (वय ७०) व सुरेश गणपती चव्हाण (वय ३८, सर्व रा. जुना चंदूर रोड) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत ३० हजार रुपयांचा मद्याचा साठा करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जुना चंदूर रोड परिसरात डॉ. चव्हाण यांचे पत्र्याच्या रोडलगत उपवर गणपत चव्हाण आणि सुरेश चव्हाण हे विनापरवाना मद्याचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून विविध कंपन्यांच्या देशी दारुच्या बाटल्या रोख रकम फ्रीज व इतर साहित्य असा २० हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल ज करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल समसेन जसा सनदी यांनी फिर्याद दिली आहे.
तर जुना चंदूर रोड परिसरातच ज्ञानगंगा गल्ली येथे पत्र्याच्या शेडमध्ये दिपक निपाने हा विपरवाना मद्याचा साठा करून त्याची खुलेआम विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणीही छापा टाकला. त्यावेळी देशी दारुच्या विविध कंपन्याच्या बाटल्या, एक फ्रिज आणि इतर साहित्य असा १२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शिरीष भास्कर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे