Aadhar Operator Bharati : २५ जुलै २०२५ रोजीपासून महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये CSC (Common Service Centre) अंतर्गत आधार ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत UIDAI आणि CSC SPV च्या माध्यमातून ही भरती होत आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांसाठी ही नोकरी कमावण्याची चांगली संधी मानली जात आहे.
या भरतीमध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, अकोला, लातूर, अमरावती, जळगाव, सातारा, बीड, रायगड आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजेच राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आधार सेवा देणारे नविन ऑपरेटर तयार करण्यात येणार आहेत.
Aadhar Operator Bharati :या पदासाठी आवश्यक पात्रता साधारणपणे सोपी आहे. उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा. संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. जर उमेदवाराकडे CCC किंवा तत्सम संगणक कोर्सचे प्रमाणपत्र असेल, तर त्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर UIDAI द्वारे घेतली जाणारी आधार ऑपरेटर/सुपरवायझर परीक्षा पास करणे बंधनकारक आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय किमान १८ वर्षे असावे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता असावी. अर्ज करणाऱ्यांनी CSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर जवळच्या CSC केंद्राशी संपर्क करून प्रत्यक्ष मुलाखतीची प्रक्रिया पार पाडावी लागते.
आधार ऑपरेटरचे मुख्य काम म्हणजे नवीन आधार नोंदणी, आधार अपडेट सेवा (फोटो, बायोमेट्रिक्स, पत्ता इ.) आणि आधार प्रिंट सेवा देणे. या सर्व सेवांवर CSC ऑपरेटरला ठराविक कमिशन मिळते. यामध्ये दररोज ३० ते ५० नागरिकांची सेवा दिल्यास दरमहा सरासरी ₹१०,००० ते ₹२५,००० पर्यंत उत्पन्न होऊ शकते. काही ठिकाणी अधिक उत्पन्न मिळाल्याची नोंद आहे.
या पदासाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे लागतात. त्यात १२वी किंवा पदवीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी दाखला, UIDAI परीक्षा पास सर्टिफिकेट, संगणक कोर्स प्रमाणपत्र (जर असेल), पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे.
भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी २५ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून, अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे. UIDAI ची ऑनलाईन परीक्षा १५ ऑगस्टनंतर होणार आहे आणि मुलाखती व निवड प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.
ही नोकरी कमिशन बेस्ड स्वरूपाची असल्याने, ऑपरेटर जितकी अधिक सेवा देईल, तितके त्याचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे हे काम फ्रीलान्स प्रकारात मोडते. आपला स्वतःचा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि बायोमेट्रिक डिव्हाइस असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.csc.gov.in किंवा apna.csc.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. तसेच 1800-121-3468 या हेल्पलाइन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता.
CSC अंतर्गत आधार ऑपरेटर पद ही डिजिटल युगातील एक उत्कृष्ट संधी आहे. कमी भांडवलात स्वतःचा आधार सेवा केंद्र चालवून चांगले उत्पन्न मिळवता येते. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.