Saturday, July 26, 2025
Homeराजकीय घडामोडीभाऊंचा दणकाच असा की….मालदीवच सगळं कॅबिनेट PM मोदींच्या स्वागताला एअरपोर्टवर उतरलं VIDEO

भाऊंचा दणकाच असा की….मालदीवच सगळं कॅबिनेट PM मोदींच्या स्वागताला एअरपोर्टवर उतरलं VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचा दौरा संपवून मालदीवला पोहोचले आहेत. शुक्रवारी सकाळी ते राजधानी मालेमध्ये दाखल झाले. विमानतळावर पीएम मोदींच्या स्वागताला राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू स्वत: जातीने हजर होतेच. पण अख्ख मंत्रिमंडळ मोदींच्या स्वागतासाठी तिथे आलेलं. राष्ट्रपती मुइज्जू यांनी पीएम मोदींची गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांचं अख्ख कॅबिनेट मोदींच्या स्वागताला विमानतळावर हजर होतं. मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि होमलँड सिक्युरिटीचे मंत्री त्यात होते.

 

पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला गेले आहेत. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेलं आहे. याच वर्षी भारत आणि मालदीवच्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत.

 

इंडिया आऊटचा नारा दिलेला

 

मालदीव आणि भारताची मैत्री दक्षिण आशियामधील सर्वात महत्त्वाची रणनितीक भागीदारी मानली जाते. दोन वर्षांपूर्वी दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू जबाबदार होते. त्यांनी मालदीवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यावेळी अनेक एक्सपर्टना वाटलेलं की, भारताने आपल्या जवळच्या समुद्र भागीदाराला गमावलं आहे.

 

पीएम मोदींच्या कूटनितीला यश

 

काहीजण याला भारतासाठी झटका म्हणत होते. काहीजण दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल चिंतित होते. पण या उलट झालं. पीएम मोदी यांनी कूटनिती आणि Soft Diplomacy च्या बळावर भारताच महत्त्व मालदीवच्या नव्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं. डॉ. मोइज्जु यांना सुद्धा समजलं की, चीनच्या तुलनेत भारत अधिक विश्वासू आणि संकट काळातील सच्चा भागीदार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कितवा दौरा?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा मालदीव दौरा आहे. मोदी 2018 साली पहिल्यांदा राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहणाच्यावेळी मालदीवला गेले होते. त्यानंतर 2019 साली पीएम मोदी यांनी मालदीवचा द्विपक्षीय दौरा केला. आता पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला चालले आहेत. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा चीनसाठी एक संदेश असणार आहे. कारण चीन भारताच्या या जुन्या मित्राला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -