Saturday, July 26, 2025
Homeब्रेकिंगसरकारी कर्मचाऱ्यांना इतक्या दिवस सुट्ट्या मिळणार; केंद्राचा मोठा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांना इतक्या दिवस सुट्ट्या मिळणार; केंद्राचा मोठा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. वृद्ध पालकांची काळजी घेण्यासारख्या वैयक्तिक कारणांसाठी हि रजा घेण्यात येईल. केंद्रीय कामकाज राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठं दिलासा मिळणार आहे. अनेकदा सरकारी कर्मचारी घरापासून लांब कामाला असल्याने आई वडिलांची काळजी घेणं त्यांना इच्छा असूनही शक्य होत नाही, कारण विषय सुट्टीचा असतो. परंतु आता हि चिंता मिटणार आहे.

 

किती सुट्ट्या मिळणार ? Government Employees

याबाबत मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हंटल कि, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२ अंतर्गत, दरवर्षी एका कर्मचाऱ्याला ३० दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेळ रजा, ८ दिवसांची कॅज्युअल रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते. या सर्व रजा कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी घेतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे सुद्धा पूर्ण करू शकतात. Government Employees

 

दरम्यान, भारत तीन प्रकारचे लघु मॉड्यूलर रिअॅक्टर (एसएमआर) विकसित करत आहे. यामध्ये २०० मेगावॅट क्षमतेचे भारत स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर (बीएसएमआर), ५५ मेगावॅट क्षमतेचे एसएमआर आणि ५ मेगावॅट क्षमतेचे उच्च तापमानाचे गॅस कूल्ड रिअॅक्टरचा समावेश आहे. यापैकी एक रिअॅक्टर हायड्रोजन उत्पादनासाठी असेल. भविष्यात ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकते आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल अशी माहितीही डॉ. जितेंद्र सिंह यांनी सभागृहात दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -