Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेत मोठा बदल होणार, राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण बैठक; या...

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेत मोठा बदल होणार, राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण बैठक; या मुद्द्यांवर चर्चा

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी नुकतंच मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची ही बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष आणि दोन्ही उपाध्यक्षांसोबत चर्चा केली.

 

रिक्त पदे भरली जाणार

यावेळी विविध विभागांमधून सादर करण्यात आलेल्या अहवालांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. या विभागीय अहवाल सादर झाल्यानंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मनसेची सद्यस्थिती काय, त्यात किती रिक्त पदे आहेत, यावरही चर्चा केली. ही सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यानुसार रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -