Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्र4 वर्षांच्या चिमुकलीचा 12 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा वसईचा...

4 वर्षांच्या चिमुकलीचा 12 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा वसईचा व्हिडिओ व्हायरल

चार वर्षांची अनविका… मंगळवारी दुपारी घराबाहेर पडली… आई तिला घेऊन बाहेर जाणार होती.. तेवढ्याच वेळेत अनविका मजल्यावरील मोकळ्या जागेत खेळत होती…

 

शेवटी तिच्या आईने चपलेच्या लाकडी रॅकवर बसवले… आईचं लक्ष नसताना अनविका खिडकीत बसायला गेली आणि शेवटी जे नको होतं तेच घडलं… खिडकीला संरक्षक जाळी नसल्याने अनविका बाराव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना घडलीये मुंबईजवळील वसईमध्ये. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

नेमके काय घडले?

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (22July 2025) दुपारच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, अनविका तिच्या आईसोबत घराबाहेर पडते. आई दार लावत असताना अनविता मोठ्या चपला घालून चालत जाते. काही सेकंदात ती चप्पल काढून समोरील घराच्या दिशेने जाते. अनविकाने मस्ती करू नये, यासाठी तिची आई अनविताला घराबाहेरील चपलेच्या लाकडी स्टँडवर बसवते. पण अनविका तिथेही शांत बसत नाही. तिथून अनविता खिडकीत बसते आणि अवघ्या काही क्षणात ती खाली पडते. खिडकीला संरक्षक जाळी नसल्याने ती खाली पडली. आईला हे लक्षात येताच ती अक्षरश: किंचाळते, अनविका खाली पडलीये असं सांगत इतरांना घराबाहेर बोलावते. अवघ्या 27 सेकंदामध्ये प्रजापती कुटुंबावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -