Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रGoogle: महत्वाची बातमी! 25 ऑगस्टपासून गुगलची ‘ही’ सेवा वापरता येणार नाही

Google: महत्वाची बातमी! 25 ऑगस्टपासून गुगलची ‘ही’ सेवा वापरता येणार नाही

आपण सर्वजण दररोज गुगलचा वापर करतो. गुगलकडून युजर्सना अनेक सेवा पुरवल्या जातात. मात्र आता कंपनीने आपली एक महत्वाची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल कंपनी यूआरएल शॉर्टनर ही सेवा बंद करणार आहे. या टूलच्या मदतीने मोठा यूआरएल लहान करण्यास मदत होत होती, मात्र आता हे टूल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो युजर्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार गुगलने 2018 मध्ये हे टूल बंद करण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षीही कंपनीने गुगल यूआरएल शॉर्टनर काही काळानंतर बंद होणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता हा बदल पुढील महिन्यात लागू होणार आहे. 25 ऑगस्ट 2025 पासून युजर्स ही सेवा वापरू शकणार नाहीत.

 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गुगलची यूआरएल शॉर्टनर सेवा बंद होणार आहे. याबाबतची लिंक ओपन केल्यास तुम्हाला 404 एरर पेज दिसेल. 404 एरर म्हणजे संबंधित लिंक किंवा वेब पेज अस्तित्वात नाही.

 

ही सेवा का बंद होणार?

 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत गुगल यूआरएल शॉर्टनरवरील ट्रॅफिक कमी झाले आहे. आता गुगल यूआरएल शॉर्टनरची जागा फायरबेस डायनॅमिक लिंक्स (एफडीएल) ने घेतली आहे. याद्वाले युजर्स थेट अँड्रॉइड, आयओएस आणि वेब वर प्रवेश मिळवू शकतात, त्यामुळे ही आता गुगल यूआरएल शॉर्टनर ही सेवा बंद होणार आहे. मात्र लोकेशन शेअरिंगसाठी गुगल अ‍ॅप्सद्वारे जनरेट केलेले goo.gl लिंक्स काम करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

या फोनमध्ये Chrome चालणार नाही

 

गूगलने आपल्या प्रसिद्ध वेब ब्राऊझर Chrome संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल डिव्हाइसेससाठी Chrome चं सपोर्ट बंद होणार आहे. Chrome लगेचच काम करायचं थांबवणार नाही. पण त्याला भविष्यात कोणतेही अपडेट्स न मिळाल्याने बग्स, सिक्युरिटी लूपहोल्स आणि डेटा रिस्क वाढू शकते. विशेषतः जे वापरकर्ते इंटरनेटवर बँकिंग, ईमेल्स किंवा अन्य संवेदनशील काम करतात त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -