Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रपाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तलाक

पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तलाक

नवविवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी निकाह वेळी पाच लाख हुंडा न दिल्याच्या कारणाने विवाहितेचा छळ करून तलाक दिल्याचा प्रकार भिवंडीतून समोर आला आहे.या छळाप्रकरणी पती व त्याच्या मैत्रिणीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण रोड लकडा मार्केट परिसरात राहणारी सना सैफअली कुरेशी, हिचा 13 जून रोजी तालुक्यातील कोनगाव येथील सैफ अली शब्बीर कुरेशी सोबत निकाह झाला होता. परंतु त्यानंतर पती सैफअली, पतीची मैत्रिणी यांच्यासह सासरच्या मंडळींनी मिळून यांनी 13 जून ते 2 जुलै याकाळात संगनमत करून नवविवाहिता सना हिचा तिच्या आई वडिलां कडून हुंडा म्हणून 5 लाख रूपयांची मागणी केली.

 

पैसे न दिल्याने विवाहितेस शिवीगाळ, धमकी व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तर पती सैफ याने विवाहितेस मोबाईल वर फोन करून मैं तुझे तलाक देता हु। असे सांगत तीन वेळा तलाक असे बोलून तलाक दिला तर मैत्रिणीने तु मेरे पती के लाईफ से निकल जा। वरना मैं और सैफ दोनो मिलकर तुझे मार देंगे। अशी धमकी दिली. या प्रकरणी सना हिने दिलेल्या तक्रारीवरून पती सह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -