Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रहरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात मोठी दुर्घटना, चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू, 29 जखमी

हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात मोठी दुर्घटना, चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू, 29 जखमी

हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी सव्वानऊच्या आसपास मोठी दुर्घटना घडली आहे, मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झाले आहेत. मनसा देवीचं हे मंदिर एका टेकडीवर बांधण्यात आलं आहे, या मंदिरात पोहोचण्यासाठी तब्बल 800 पायऱ्या चढाव्या लागतात.

 

या घटनेचा एक प्रत्यक्षदर्शी असलेल्या संतोष कुमार यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 25 पायऱ्या बाकी होत्या, तेव्हा ही दुर्घटना घडली. रविवार असल्यानं मनसा देवीच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याचदरम्यान काही लोक तिथे असलेल्या तारेला धरून रांगेत पुढे-पुढे सरकत होते, याचदरम्यान या तारेवरचं प्लॅस्टिकचं कव्हर बाजुला झालं, आणि त्यामध्ये करंट उतरला, त्यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला, जीव वाचवण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. अनेक भाविक पायऱ्यांवरून खाली पडले.

 

मात्र दुसरीकडे पोलिसांनी तारेमध्ये कोणतंही करंट उतरलं नव्हतं, ती एक अफवा होती असं म्हटलं आहे. गढवाल डिव्हिजनचे कमिश्नर विनय शंकर पांडे यांनी म्हटलं की, तारेमध्ये कोणतंही करंट नव्हतं, मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 29 जण जखमी झाले आहेत, जखमी लोकांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री धामी यांनी घेतली जखमींची भेट

 

दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी या घटनेत जखमी झालेल्या लोकांची भेट घेऊन, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन उपचाराबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.मुख्यमंत्र्यांकडून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींसाठी दोन लाखांची तर जखमींसाठी 50 हजारांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

 

अफवेमुळे जीवितहानी

 

तारेमध्ये करंट उतरल्याची अफवा पसरल्यामुळे ही जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे, तारेत करंट उतरल्याची अफवा पसरली, लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली आणि चेंगराचेंगरी झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -