Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीनांदणीची महादेवी हत्तीण अखेर गुजरात ला रवाना

नांदणीची महादेवी हत्तीण अखेर गुजरात ला रवाना

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाचा ‘माधुरी उर्फ महादेवी हत्तीणला वनताराला पाठविण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम करत सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सोमवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘महादेवी हत्तीण’ ची बिदाई केली. नांदणी गावातून भव्य

 

मिरवणुक काढून वनताराच्या पथकाकडे ‘महादेवी हत्तीण ला सुपूर्द केले.

 

प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवून नांदणी येयील ‘माधुरी उर्फ महादेवी हत्तीण ‘ला गुजरात येथे २ आठवड्यात पाठविण्याचे परवानगी दिली होती.

 

त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील बनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हती कल्याण केंद्रात नेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात हे पथक दाखल झाले होते. नांदगी मठाने उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर शुक्रवारची सुनावणी सोमवारी झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाम कायम ठेवून नांदणी मठाची याचिका फेटाळून लावली. सोमवारी सायंकाळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळके, पोलीस निरीक्षक शिवाजी

 

गायकवाड यांनी मठात धाव घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हत्तीला सुपूर्द करावी असे सांगितले. बाबर मठाने न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला जाणार नाही. हत्तीची बिदाई विधी व गावातून मिरवणुक काढून हत्ती सुपूर्द करत असल्याची सांगितले. हत्ती सोमवारी रात्री जाणार हा निरोप पंचक्रोशीत पोहोचण्याने हजारो नागरिकांनी नांदणीत धाव घेतली, निशीथी येथून जनसमुदायाच्या उपस्थितीत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था मठात हती आणण्यात आला. यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी,

 

महिला, पुरुष व सर्वधर्मीय नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. अखेर बिदाईचे धार्मिक विधी संपत्र झाल्यानंतर हत्तीगला मठाबाहेर आणण्यात आले आणि गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक काढण्यात आली, “महादेषी हलीण आम्हाला सोडून जाणार या भावनेतून प्रत्येक महिला हत्तीच्या पायावर पाणी घालून औक्षण करीत अधू ढाळत होत्या, प्रचंड अशा जनसमुदायातून हत्तीणीची गावातून मिरवणुक काढण्यात आली, त्यानंतर हत्तीगता पुन्हा निशीधीवर आणण्यात आले. यानंतर बनताराच्या बाहनातून हत्तीची रवानगी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -