Friday, February 23, 2024
Homeसांगलीसांगली : मणेराजुरीतील 'त्या' तिघांची आत्महत्या लग्नाच्या वादातून?, हार, गुच्छ सापडल्याने संशय...

सांगली : मणेराजुरीतील ‘त्या’ तिघांची आत्महत्या लग्नाच्या वादातून?, हार, गुच्छ सापडल्याने संशय बळावला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी तिघांनी केलेल्या आत्महत्येची घटना प्रेमाच्या त्रिकोणातून झाली असावी, असे पोलिस तपासात समोर येत आहे. या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी मणेराजुरी शेजारच्या डोंगरावर हरिश जमदाडे, प्रणाली पाटील (रा. मणेराजुरी, ता. तासगाव) व शिवानी घाडगे (रा. हतीद, ता. सांगोला) या तिघांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. आत्महत्या केलेले हरिश जमदाडे, प्रणाली पाटील हे स्थानिक असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचण आली नाही. शिवानी घाडगे हिचेही मणेराजुरी येथे नातेवाईक असल्याने तिचेही या गावात येणे-जाणे होते. त्यामुळे तिची ओळख पटली.

तिघांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी का आत्महत्या केली? याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. हरिश व प्रणाली यांच्यात प्रेम संबंध होते. त्यातून प्रणाली हिच्याशी हरिश हा लग्न करणार असावा असा अंदाज आहे. लग्नाच्या उद्देशानेच तिने त्यावेळी नवी साडी नेसली असावी असा पोलिसांचा कयास आहे. लग्न करण्याच्या उद्देशानेच त्यांनी हार, गुच्छ सोबत घेतले असावेत या निष्कर्षापर्यत पोलिसांचा तपास आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -