ताजी बातमी ऑनलाईन टीम
कुपवाड, बुधगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एमआयडीसीतील एका प्रेमी कामगार युगलाने प्रथम किटकनाशक प्राशन केले. त्यानंतर दोघांनी शेडमधील छताच्या लोखंडी अँगलला एकाच साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि.२५) शनिवारी सकाळी उघडकीस आली.
राजू महादेव माळी (वय ३६, सध्या राहणार कुपवाड) व रीना किरण पार्लेकर (वय ३३, राहणार मिरज) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
.
पोलिसांनी दिलेली माहिती व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: मयत राजू माळी हा बुधगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात भाड्याने कुटुंबांसह राहतो. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.
पत्नीने त्याला सोडून मुलाला सोबत घेऊन माहेरी (कर्नाटक) गेल्या एक वर्षापूर्वी गेली आहे. तो कुपवाड एमआयडीसीतील एका गारमेंटमध्ये बसचालक म्हणून नोकरी करीत होता. तर त्याच गारमेंटमध्ये रीना पार्लेकर ही महिला नोकरी करीत होती.
दरम्यान, याच कालावधीत या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. गेली काही महिने झाले रीना काम संपल्यावर ती नेहमी राजू याच्या घरी ये जा करीत होती.
नेहमीप्रमाणे काम संपल्यावर शुक्रवारी सायंकाळी हे प्रेमी युगुल माळी याच्या घरी आले. त्यानंतर ते दोघे शेजारील एका शेतकऱ्याच्या मळ्यात गेले. त्याठिकाणी पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून दोघेजण शुक्रवारी रात्री आत गेले. दाराला आतून कडी लावून घेतली. त्यानंतर दोघांनी कोणतेतरी किटकनाशक प्राशन केले.
कुपवाड एमआयडीसीतील मध्यमवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -