Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रआयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी या संघाने घेतला मोठा निर्णय, हेड कोचला दाखवला बाहेरचा...

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी या संघाने घेतला मोठा निर्णय, हेड कोचला दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आतापासून जोरदार तयारी सुरु झाली आहे. सर्वच संघांची जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. त्यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण आरोनला गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवडलं आहे. तर इतर फ्रेंचायझी ट्रेड विंडो आणि मिनी लिलावाच्या माध्यमातून खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स नव्या प्रशिक्षकासह मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने हेड कोच चंद्रकांत पंडित यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएल किताब जिंकला होता. पण आता केकेआरला त्यांची साथ मिळणार नाही.

 

केकेआरच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण पंडित यांचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली मागच्या काही पर्वात केकेआरने चांगली कामगिरी केली होती. फ्रेंचायझीने ट्वीट करत माहिती दिली की, ‘श्री चंद्रकांत पंडित यांनी नवीन संधी शोधण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुढे राहणार नाहीत. २०२४ मध्ये केकेआरला आयपीएल चॅम्पियनशिपमध्ये नेणे आणि एक मजबूत, लवचिक संघ तयार करण्यात मदत करणे यासह – त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्या नेतृत्वाचा आणि शिस्तीचा संघावर कायमचा प्रभाव पडला आहे. आम्ही त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’

 

चंद्रकांत पंडित यांचा केकेआरसोबत 2022 पासून प्रवास सुरु झाला होता. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमन यांच्या जागी त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तीन पर्वात केकेआरचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या नेतृत्वात केकेआरने 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. या विजयात चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर यांचा मोलाचा वाटा होता. पण 2025 च्या पर्वात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली. साखळी फेरीत 14 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवला. प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकले नाहीत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -