Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रशिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतच अश्लील चाळे; इंस्टावरुन करायची अर्धनग्न व्हिडिओ कॉल,पोक्सोचा गुन्हा दाखल

शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतच अश्लील चाळे; इंस्टावरुन करायची अर्धनग्न व्हिडिओ कॉल,पोक्सोचा गुन्हा दाखल

मुंबईत काही दिवसांपूर्वीच एका शाळेतील शिक्षकेने विद्यार्थ्याला (Student) आपल्या जाळ्यात ओढल्याची घटना उघडकीस आली होती. विशेष म्हणजे कारमधून ह्या विद्यार्थ्याला फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नेऊन, दारु पाजून शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडायची, अशी घटना समोर आली होती. आता, त्यानंतर, नवी मुंबईतूनही एका शिक्षिकेनं शाळेतील (School) अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी,संबंधित शिक्षिकेविरुद्ध नवी मुंबईतील (Navi mumbai) कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नवी मुंबईतील एका शिक्षिकेने तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विदयार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांकडून कोपरखैरणे येथील ठाण्यात शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शिक्षिका ही इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विदयार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, आरोपी शिक्षिकेला अटक केली असताना न्यायालयाने शिक्षिकेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संबंधित शिक्षिकेने शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत, आणखी कोणासोबत अशा प्रकारचे कृत्य केले आहे का? या दिशेने कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेनं शाळेत आणि शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

याच महिन्यात मुंबईतही असाच प्रकार

दरम्यान, मुंबईतून याच महिन्याच्या पहिल्या आठवड्या एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथील एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याशिवाय, ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची तिथे ती त्याचे शोषण करायची, असेही पोलिस तपासातून समोर आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -