Monday, August 25, 2025
Homeब्रेकिंगआता थांब रे बाबा…! राज्यात पावसाचा कहर, हवामान खात्याकडून थेट मोठा इशारा,...

आता थांब रे बाबा…! राज्यात पावसाचा कहर, हवामान खात्याकडून थेट मोठा इशारा, धोक्याची घंटा

राज्यात मॉन्सून जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. जवळपास सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले. मराठवाडयातील काही भागांमध्ये अजूनही म्हणावा तसा पाऊस होताना दिसत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाने अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. राज्यातील धरणे जवळपास भरण्याच्या आसपास आहेत. यंदा राज्यात दरवर्षीपेक्षा लवकरच मॉन्सून दाखल झाला होता.

 

विदर्भात आज पावसासाठी पोषक वातावरण असल्याने जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच कोकणात देखील पाऊस असणार आहे. विदर्भ आणि कोकणात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबईमध्ये सकाळीच पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. पुण्यातही ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने काल अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.

 

रत्नागिरी, रायगड, सातारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, भंडारा, नागपूर, गोदिंया, यवतमाळ, वर्धा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. संपूर्ण देशभरात पाऊस सध्या सुरू आहे.

 

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे तानसा व मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांतील पाणीसाठा आजघडीला ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. भविष्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मुक्कामी राहिल्यास उर्वरित धरणे लवकरच ओसंडून बाहू लागतील.

 

उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांमधून मुंबईकरांना प्रतिदिन ३,९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभाग चितित झाला होता. मात्र, पावसाने में महिन्यात दमदार हजेरी लावली व धरणांतील पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली.

 

खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. घाटमाथा आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय. सध्या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 17974 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. सध्या खडकवासला धरणाची पाणी पातळी 62 टक्के आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -