Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरअंबानी कायदेशीर लढाई जिंकले पण नांदनीच्या गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

अंबानी कायदेशीर लढाई जिंकले पण नांदनीच्या गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

गेल्या 30 वर्षांपासून अधिक वर्ष शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर सोमवारी (ता. 28 जुलै) रात्री गुजरातकडे रवाना झाली.

 

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. यावेळी आक्रमक गावकऱ्यांनी ज्या वाहनातून महादेवीला नेण्यात येत होते. त्यावर दगडफेक केली. पण तरीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयानुसार महादेवीची पाठवणी अनंत अंबानी यांच्या मालकीच्या वनतारा या जागी रवाना करण्यात आले. पण यानंतर आता नांदनी गावातील ग्रामस्थांनी अंबांनीविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. (Nandani Villagers took a big decision after Mahadevi was sent to Vantara)

 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नांदणी हे गाव आहे. या गावात जैन समाजाचे मठ असून या गावात या समुदायाचे लोक सर्वाधिक वास्तव्यास आहेत. नांदणीतील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठामध्ये माधुरी ऊर्फ महादेवी नावाची हत्तीण ही गेल्या 33 वर्षांपासून वास्तव्यास होती. मठासोबतच नांदणीतील गावकऱ्यांनी महादेवीला लहान लेकरासारखे सांभाळले आणि महादेवीने सुद्धा मठात येणाऱ्या भक्तांना, गावकऱ्यांना आपले समजून प्रेम केले. पण आता महादेवी आपल्या लोकांच्या प्रेमाला परकी झाली आहे. सोमवारी महादेवीला अंबानींच्या मालकीच्या वनतारा येथे रवाना केल्यानंतर आता शिरोळ ग्रामस्थांनी अंबानी समुहाच्या जीओ सीमकार्ड बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नांदणी ग्रामस्थांसोबतच संपूर्ण शिरोळ तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपले जिओ सीमकार्ड इतर कंपनीच्या सीमकार्डमध्ये पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. पण ग्रामस्थांकडून जिओचे सीमकार्ड पोर्ट करण्यात येत असून आता जिओचे रिप्रेझेंटेटिव्ह ग्राहकांशी संवाद साधत आहेत. पण रिप्रेझेंटेटिव्हसोबत सुद्धा ग्रामस्थ अत्यंत संतापाने बोलत असून थेट अंबानीचे नाव घेत आहे. तुमचा पॅक शिल्लक आहे, तरी तुम्ही सीमकार्ड पोर्ट का करत आहात? अशी विचारणी जिओच्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना करण्यात येत आहे. पण यावर मात्र नागरिकांकडून “आमचा हत्ती परत आणून द्या” अशी मागणी करण्यात येत आहे. ज्यामुळे आता जिओ कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

 

नांदणी ग्रामस्थांनी केवळ जिओ सीमच नाही तर अंबानींच्या उत्पादनांवर सुद्धा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिओ नेटवर्क कस्टमर केअरमध्ये शेकडो कॉल जाऊन धडकत आहेत आणि जिओवर बहिष्कार घालणार असल्याचे सांगत आहेत. आमच्या 5-50 जणांनी काही फरक पडणार नाही. मात्र जेव्हा या मोहिमेला व्यापक स्वरूप देऊ त्यावेळी तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील, असेही काही ग्राहक जिओच्या कस्टमर केअरमधील एक्झिक्युटिव्हना सुनावताना दिसून येत आहेत. तुमच्या मालकाला आमचा हत्ती परत आणून देण्यास सांगा, जेव्हा आम्हाला आमचा हत्ती परत मिळेल, तेव्हा आम्ही जिओचे सीम पुन्हा सुरू करू, असे नांदणी ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -