Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रहप्ता भर अन् बायकोला जा घेऊन...' कर्ज न फेडल्याने बँकेनं महिलेला सोडलंच...

हप्ता भर अन् बायकोला जा घेऊन…’ कर्ज न फेडल्याने बँकेनं महिलेला सोडलंच नाही, पती विनंती करून दमला अखेर…

अनेकांना पैशांची गरज असतेच. त्यामुळे काही सामान्य लोक खासगी बँकांमधून कर्ज घेत असतात, कर्ज घेणं हे सोपं असतं, पण जेव्हा कर्जाची रक्कम आणि चक्रीव्याज या सर्व अर्थकारणाचा विपरीत परिणाम हा कर्जबाजाऱ्यांच्या भूकेवर येऊन ठेपतो.

 

याचमुळे त्यांना कर्ज फेडणं अगदी अवघड होऊन जातं. त्यानंतर बँकेतून कर्ज फेडण्यासाठी फोन येत असतात. काही वेळा वस्तू गहाण ठेवावी लागते. पण एका बँकेनं कर्जबाजारी पतीच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील झांशी येथील ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वचजण हादरून गेले आहेत.

 

नेमकं प्रकरण काय?

 

झाशीतील एका रविंद्र वर्मा नावाच्या व्यक्तीची पत्नी पूजा वर्माला सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कर्ज काढलेल्या एका बँकेत जबरदस्ती ठेवण्यात आले होते. पती जेव्हा बँकेत गेला तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हाच आम्ही तुमच्या पत्नीला सोडून देऊ असं त्यांनी सांगितलं. पती रविंद्रने बँकेना अनेकदा विनंती केली असता, पत्नीला सोडलंच नाही. अंतिम क्षणी रविंद्रने 112 वर फोन केला. संबंधित प्रकरणात पोलीस हे बँकेत आले. हे सर्व पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा महिलेला सोडण्यात आले, अशी घटना उघडकीस आली.

 

पीडितेनं अर्जात मनातील सल व्यक्त केली

 

पीडिता पूजा वर्मा यांनी दिलेल्या एका अर्जात सांगितलं की, तिने 40 हजार रुपयांचे कर्ज घेतलं होते. आतापर्यंत तिने 11 हप्ते जमा केले. परंतु बँकेच्या एकूण रेकॉर्डमध्ये केवळ 8 हप्तेच भरलेले दिसत आहेत. बँक एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी तिचे तीन हप्ते हडप केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, बँक सीओ संजय यादव यांनी सोमवारी तिच्या घरी पोहोचून धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. नकार दिल्यानंतर पती-पत्नीला जबरदस्तीने बँकेत आणले गेले, बराच वेळ बसवून ठेवण्यात आले.

 

कानपूरातील देहातील रहिवासी बँक व्यवस्थापक अनुज कुमार यांनी सांगितलं की, महिला ही गेली 7 महिन्यांपासून हप्तेच भरत नव्हती, म्हणून तिला बोलावले गेली. त्यानंतर त्यांनी दावा केला की, महिला ही स्वत:च्या मर्जीनेच बँकेत बसली होती. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बँक कर्मचारी, एजंट आणि पीडितेच्या बाजूने कसून चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -