Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगसाडी ठरली महत्त्वाचा पुरावा, 5000 अश्लील व्हिडीओ अन् मोलकरणीवर अत्याचार, कोर्टाकडून प्रज्ज्वल...

साडी ठरली महत्त्वाचा पुरावा, 5000 अश्लील व्हिडीओ अन् मोलकरणीवर अत्याचार, कोर्टाकडून प्रज्ज्वल रेवन्ना दोषी, नेमकं प्रकरण काय?

बंगळुरू मधील विशेष न्यायालयाने काल (शुक्रवारी ता. 1) जनता दल (सेक्युलर) चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट हे आज (शनिवारी, 2 ऑगस्ट) रेवण्णा याला शिक्षा सुनावणार आहेत. रेवण्णाने त्याच्या कुटुंबाच्या फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने मागील वर्षी एप्रिलमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होता. तिने रेवण्णा यांच्यावर 2021 पासून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता रेवण्णावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो लीक करणे अशा कलमांखाली आरोप करण्यात आले होते. गेल्या वर्षी सेक्स स्कॅण्डलमध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचे नाव चर्चेत आलं होतं. रेवण्णावर 50 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

 

जेव्हा मोलकरणीने तक्रार दाखल केली, तेव्हा प्रज्वलविरुद्ध पहिला गुन्हा 28 एप्रिल 2024 रोजी नोंदवण्यात आला. तक्रारदार महिला ही कुटुंबाच्या फार्महाउसमध्ये काम करणारी 47 वर्षीय माजी मोलकरणी होती. तिने सांगितले की प्रज्वलने तिच्यावर एकदा नाही तर दोनदा बलात्कार केला.

 

साडी ठरली महत्त्वाचा पुरावा

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने घातलेली साडी ही ठरली आहे. तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे (स्पर्मचे) डाग आढळून आले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवण्णाचे असल्याचं समोर आलं आहे. मोलकरणीची ती साडी मोठा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली होती. हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला. त्याचबरोबर बलात्काराचे व्हिडिओ देखील कोर्टात सादर करण्यात आले होते. पीडितेने केवळ साडी जपून ठेवली नाही. तर तिने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्डही केला होता.

 

काय आहेत नेमके आरोप ?

या प्रकरणी एसआयटीने 1,632 पानांचे आरोपपत्र सादर केले होते. त्यामध्ये 113 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या खालील कलमांखाली गुन्हे दाखल होतेः कलम 376(2) (के) : तुम्ही एखाद्या महिलेवर नियंत्रण किंवा वर्चस्वाच्या स्थितीत असताना तिच्यावर बलात्कार करणे, कलम 376(2) (एन) -एकाच महिलेसोबत वारंवार बलात्कार करणे, कलम 345अ – लैंगिक छळ, कलम 345ब -एखाद्या महिलेला निर्वस्त्र करण्याच्या हेतूने केलेला हल्ला, कलम 345सी (दुसऱ्याच्या खासगी क्षण चोरून बघणे), कलम 506 हत्योची धमकी, कलम 201 – पुरावे नष्ट करणे, शिवाय कलम 66ई (गोपनीयतेचा भंग) अंतर्गतही गुन्हा दाखल होता.

 

5000 अश्लील व्हिडीओ क्लिप

रेवण्णाच्या तीन ते 5000हून अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर समोर आल्या. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान आजच्या शिक्षेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -