Saturday, August 2, 2025
Homeयोजनानोकरीरेल्वे विभागात 3115 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

रेल्वे विभागात 3115 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

देशात सर्वाधिक रोजगार देणारी संस्था म्हणून भारतीय रेल्वेला ओळखले जाते. रेल्वेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाते. रेल्वेचं जाळं मोठं असल्याने ती अपेक्षितही आहे. नुकतंच पूर्व रेल्वेने ३११५ पदांची भरती जाहीर केली आहे. हि भरती अप्रेंटिस या पदासाठी होणार असून येत्या १४ ऑगस्टपासून यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरती साठी पात्रता काय असेल? कोणत्या विभागात किती जागा भरल्या जातील? अर्ज शुल्क किती लागेल? आणि कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याबाबतची A To Z माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

एकूण पदांची संख्या – ३११५

 

कोणकोणती पदे भरली जाणार – या भरतीअंतर्गत फिटर, वेल्डर, सुतार, रंगारी, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मशिनिस्ट पूर्व रेल्वे, अशा विविध ट्रेडमध्ये भरती केली जाणार आहे.

 

विभागवार भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या –

 

1) हावडा विभाग ६५९

२) लिलुजा कार्यशाळा ६१२

३) सेल्डा विभाग ४४०

४) कांचरपारा कार्यशाळा १८७

५) मालदा विभाग १३८

६) आसनसोल विभाग ४१२

७) जमालपूर कार्यशाळा ६६७

 

 

शैक्षणिक पात्रता- Eastern Railway Recruitment 2025

रेल्वे अप्रेंटिस पदासाठी उमेदवार हा किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI पदवी उतीर्ण असला पाहिजे.

 

वयोमर्यादा–

 

रेल्वे अप्रेंटिस या पदासाठी किमान १५ वर्षे तर कमाल २४ वर्षाचा उमेदवार पात्र ठरेल.

 

शुल्क:

 

पूर्व रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवाराला सामाजिक आरक्षणानुषार शुल्क लावले आहे. (Eastern Railway Recruitment 2025)

 

ओपन आणि ओबीसी: १०० रुपये

 

अनुसूचित जाती, जमाती, अपंगत्व, महिला : मोफत

 

उमेदवाराची निवड प्रक्रिया:

गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

दहावीची गुणपत्रिका

१२वीची गुणपत्रिका

पदवी गुणपत्रिका

पदानुसार पदवी/डिप्लोमा आवश्यक

जात प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठसा

 

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाइट www.rrcer.org ला भेट द्या. Eastern Railway Recruitment 2025

त्यानंतर अप्रेंटिस भरती २०२४ साठी “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.

पुढे ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.

भरतीच्या फॉर्मवरती विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा

आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर online फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -