भारतातील देवस्थानं गर्भश्रीमंत आहेत. अनेक बातम्यांनुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) येथील भगवान वेंकटेश्वर यांच्या भक्तांकडून दरवर्षी लाखो रुपये दान केले जातात. या हे सर्व दान मंदिराच्या हुंडीत जमा होते. या दानास श्री वराह स्वामी मंदिरातील नवीन पराकामणी भवनात वेगवेगळे केले जाते. रोख रक्कम आणि नाण्यांची मोजणी नियमितपणे केली जाते. तर सोने आणि मुल्यवान वस्तूंना सुरक्षेत लॉकरमध्ये जमा केले जाते. महिन्याच्या अखेरीस या वस्तू टीटीडी ट्रेझरी तिरुपती मंदिरात पाठवली जाते. तिरुमाला तिरुपती देवस्थानमने जारी केलेल्या आकड्यांनुसार २०२४ मध्ये एकूण १,३६५ कोटी रुपयांचे रेकॉर्ड हुंडी उत्पन्न प्राप्त झाले आहे.
या तिरुपती बालाजी मंदिरात साल २०२२ मध्ये श्रीवारीच्या हुंडीचे उत्पन् १,२९१.६९ कोटी होते. तर २०२३ मध्ये हे १,३९१.८६ कोटी होते. गेल्यावर्षी २.५५ कोटी भक्त मंदिरात आले होते. ९९ लाख लोकांनी केसदान केले आणि ६.३० कोटी लोकांना अन्नप्रसादम देण्यात आला. या शिवाय १२.१४ कोटी लाडू विकले गेले. तुलना केली असता २०२२ मध्ये हे उत्पन्न १,२९१.६९ कोटी रुपये होते आणि २०२३ मध्ये १,३९१. ८६ कोटी रुपये होते.
४,००० किलोग्रॅम सोने दान
रोकड वगळून ४,००० किलोग्रॅम सोने तिरुमाला तिरुपती देवस्थानमला दान म्हणून मिळाले आहे. आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये १,०३१ किलोग्रॅम सोने जमा झाले आहे. ज्यामुळे आतापर्यंत एकूण ११,३२९ किलोग्रॅम सोने जमा झाले आहे. टीटीडीमध्ये दान केलेले सोने बँकेत जमा केले जाते. गेल्या तीन वर्षात ६११ कोटी रुपये हुंडी दानामुळे, १,१६७ कोटी व्याजातून आणि १५१.५० कोटी केसदानातून आणि १४७ कोटी रुपये खोल्या आणि कल्याण मंडप वाटपातून येण्याची आशा आहे.
दानातून होतात ही कामे
मनुष्यबळ विकास आणि अन्य योजनांसाठी यातील मोठी रक्कम दान केली जाते. त्याशिवाय १,७७३ कोटी रुपये वेतन आणि भत्त्यांवर खर्च होते. आणि ३५० कोटी अभियांत्रिकी कामासाठी खर्च केली जाते. तर १०८.५० कोटू रुपये हिंदू धर्म प्रसार परिषदसाठी आणि ११३.५० कोटी रुपये विविध संस्थांना वाटली गेली आहे.