Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगड्रायव्हिंग लायसन्सशिवाय ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवता येणार! किंमत 60 हजारापेक्षा कमी

ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवता येणार! किंमत 60 हजारापेक्षा कमी

पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता मागच्या काही वर्षात भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढली आहे. Zelio E Mobility कंपनीने बाजारात Eeva इलेक्ट्रिक स्कूटरचं नवं अपडेटेड वर्जन लाँच केलं आहे. ही स्कूटर नुसती अपडेट केली नाही तर पहिल्या स्कूटरच्या तुलनेत जबरदस्त आहे. त्यामुळे गाडी चालवताना चांगली अनुभूती मिळणार आहे. तीन प्रकारात ही गाडी लाँच करण्यात आली आहे. या गाडीची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. इतकंच काय एकदा ही गाडी फूल चार्ज केली की 120 किमी अंतर कापते. या गाडीला लायसन्सची खरंच गरज नाही का? तर त्याचं कारण असं की, ज्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पीड 40 किमी प्रतीतासापेक्षा कमी असतो. त्याला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नसते. त्यामुळे तुम्हाला ही गाडी चालवायची असेल तर ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. तसेच आरटीओत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.

 

तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर त्यासाठी व्हेरियंटनुसार किंमत मोजावी लागेल. 60V/32AH जेल बॅटरी व्हेरियंटची किंमत 50 हजारापासून सुरु होते. या गाडीची रेंज 80 किमी आहे. तर 72V/42AH बॅटरी व्हेरियंटची किंमत 54 हजार रुपये आहे. याची रेंज 100 किमी आहे. तर लिथियम आयन बॅटरी असलेल्या 60V/30AH व्हेरियंटची किंमत 64 हजार रुपये आहे. त्याची रेंज 90 ते 100 किमी आहे. 74V/32AH बॅटरी व्हेरियंटची किंमत 69 हजार आहे. त्याची रेंज 120 किम आहे. सर्व व्हेरियंट 25 किमी प्रतीतासाची टॉप स्पीड देतात. वाहन निर्माता या इलेक्ट्रिक स्कूटरवर दोन वर्षांची वॉरंटी आणि सर्व बॅटरी प्रकारांवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे.

 

इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लियरेंट 150 मीमी, तर वजन 85 किलो वजन आहे. बॅटरीच्या प्रकारानुसार चार्जिंगची वेळ वेगवेगळी आहे. लिथियम आयन बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. तर जेल व्हेरियंटसाठी 8 ते 10 तास लागतात. इतर फीचर्सबाबत सांगायचं तर, डिजिटल डिस्प्ले, डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), कीलेस ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्म, पार्किंग गियर, USB चार्जिंग पोर्ट आणि पॅसेंजर फूटरेस्ट आहे. ही गाडी ब्लू, ग्रे, व्हाईट आणि काळ्या शेडमध्ये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -