Tuesday, August 5, 2025
Homeब्रेकिंगसासू सुनेचं प्रत्येक पार्सल उघडून पाहायची, महिलेनं ऑर्डर केली अशी वस्तू, त्यानंतर...

सासू सुनेचं प्रत्येक पार्सल उघडून पाहायची, महिलेनं ऑर्डर केली अशी वस्तू, त्यानंतर सासूने कधीच सुनेच्या पार्सला हात लावला नाही

संयुक्त किंवा मोठ्या कुटुंबामध्ये राहणं तसा खास अनुभव असतो. मोठ्या कुटुंबात राहण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला भरपूर प्रेम मिळतं. तुमची काळजी करणारे अनेकजण कुटुंबात असतात. तुम्हाला कधीच एकटेपणाची जाणीव होत नाही. मात्र जसे मोठ्या कुटुंबात राहण्याचे काही फायदे आहेत, तसेच मोठ्या कुटुंबात राहण्याचे काही तोटे देखील आहेत. मोठ्या कुटुंबात तुम्हाला प्रायव्हसी मिळत नाही, जेव्हा तुमच्या नावाने तुमच्या घरी एखादं कुरिअर किंवा पार्सल येतं, तेव्हा तुमच्या घरातील व्यक्ती कोणताही मागचा -पुढचा विचार न करता तुम्हाला आलेलं पार्सल उघडून पाहातात, होऊ शकतं की त्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी काही खासगी वस्तू मागवलेल्या असू शकतात. अशावेळी तुम्ही अडचणीत येतात.

 

अशीच एक घटना समोर आली आहे, एक महिला मोठ्या कुटुंबात राहाते, मात्र एका गोष्टीमुळे ती खूपच टेन्शनमध्ये होती. तिची सासू आपल्या सुनेला आलेलं प्रत्येक पार्सल उघडून पाहायची. सून आपल्या सासूच्या या सवईमुळे परेशान होती. त्यानंतर तीने सासूला धडा शिकवायचा निर्णय घेतला, त्यानंतर तिने असं काही सामान ऑर्डर केलं की सासूनं पार्सल उघडताच घरामध्ये शांतता पसरली, परत कधीच सासूनं सुनेचं पार्सल उघडून पाहिलं नाही.

 

पार्सलमध्ये नेमकं काय होतं?

 

सुनेनं आपला हा अनुभव सोशल मिडिया साईट रेडयटवर शेअर केला आहे, तीने म्हटलं की माझ्या सासूला माझ्या परवानगीशिवाय माझं पार्सल उघडून पाहायची सवय होती, सासूची ही सवय मोडण्यासाठी मी एक युनिक युक्ती केली. मी माझ्या नावाने खास वृद्ध व्यक्तींसाठी बनवलेलं भयानक आणि भीतीदायक खेळणं ऑर्डर केलं. आणि घरात अशी व्यवस्था केली के हे पार्सल फक्त माझी सासूच रिसिव्ह करेल. तिने ते रिसिव्ह देखील केलं, मात्र जेव्हा तिने ते उघडलं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला, ती ते खेळणं पाहून घाबरली. आता ती कधीच माझं पार्सल माझ्या परवानगीशिवाय उघडत नाही, ते पार्सल पाहून सासूला प्रचंड धक्का बसला, असं सुनेनं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -