जुलै महिन्यातील महागाईच्या आकड्यांनी सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीसमोर जून महिन्याचे महागाईचे आकडे आहेत. जून महिन्यात किरकोळ महागाई जवळपास 77 महिन्यांच्या निच्चांकावर आली. आता आरबीआयसमोर व्याज दरात कपात करावी की नाही असा प्रश्न उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे व्याज दरात किती कपात करावी हा पण एक सवाल समोर आहे. आरबीआयने जून महिन्यात रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने कपात केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात व्याज दरात 25-25 बेसिस पॉईंटची कपात केली.
आरबीआयने या वर्षात रेपो दरात 6.50 टक्क्यांहून 5.50 टक्क्यांपर्यंत कपात केली. देशात महागाई दर 2 टक्क्यांवर आला आहे. आता ऑगस्ट महिन्यात व्याजदरात किती कपात करावी हा यक्ष प्रश्न आरबीआय आणि पतधोरण समितीपुढे आहे. 6 ऑगस्ट म्हणजे उद्या आरबीआय गव्हर्नर आणि पतधोरण समितीचे अध्यक्ष त्याची घोषणा करतील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अंदाजानुसार, आताही 25 टक्के बेसिस पॉईंटची कपात होऊ शकते. तर काहींच्या मते आता दुप्पट कपात होऊन, रेपो दर 5 टक्क्यांवर येऊ शकतो. असे झाले तर हा मास्टरस्ट्रोक असेल.
SBI अहवालात म्हटलंय काय?
SBI ने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 25 बेसिस पॉईंटची कपात करू शकते. जर आता रेपो दरात कपात झाली तर फेस्विव्ह सिझनासाठी त्याचा फायदा होईल. घर आणि कार विक्री वाढू शकते. दिवाळी-दसऱ्यापर्यंत एक चांगले वातावरण राहील. ऑगस्ट 2017 मध्ये 25 आधार अंकांवरील कपातीमुळे दिवाळीच्या काळात 1956 अब्ज रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.
आरबीआयने रेपो दरात कपात केल्यास गृहकर्ज व्याज दरात मोठी कपात होईल आणि रिअल इस्टेट क्षेत्राल बुस्टर डोस मिळेल. या काळात घर खरेदीचे प्रमाण वाढण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. बँकांचा होम लोन पोर्टफोलिओ वाढेल. रेपो दरात कपात झाल्याने बँकांनी त्यांच्या रेपो-लिंक्ड ईबीएलआरमध्ये सुधारणा झाली आहे. एमसीएलआर दरात 10-65 आधार अंकांची कमी आली आहे.
50 आधार अंकांची कपात होणार?
आता ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात 50 आधार अंकांची कपात होईल का, हा सवाल विचारण्यात येत आहे. याविषयी वेल्थ ग्लोबल रिसर्चचे संचालक अनुज गुप्ता यांनी टीव्ही 9 डिजिटल टीमला माहिती दिली. त्यांच्यानुसार, 25 बेसिस पॉईंट हा ट्रेंड सेट होत आहे. याचा अर्थ आरबीआय, ऑगस्ट महिन्यात 25 आधार अंकांची कपात होण्याची शक्यता आहे. मग याचा अर्थ 50 बेसिस पॉईंटची कपात होणार नाही का?
अनुज गुप्ता यांच्या मते आरबीआय पतधोरण समिती 50 आधार अंकांची कपात करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते. त्याच्या मागे अनेक कारणं आहे. त्यात अमेरिकेचे टॅरिफ धोरण पण एक आहे. 2020 मध्ये दोनदाच रेपो दरात कपात झाली होती. तर पण त्यावेळी 115 बेसिस पॉईंटची कमी आली. गेल्या तीन पतधोरण समितीच्या बैठकीनंतर एक टक्क्यांची कपात पाहायला मिळाली. त्यामुळे येत्या ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्याच्या बैठकीत एक टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. असे झाले तर ही ग्राहकांसाठी मोठी लॉटरी ठरेल.