मागच्या काही दिवसापासून कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीची जोरदार चर्चा सुरु आहे. महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवल्यानंतर कोल्हापूरकर भावुक झाल्याचे बघायला मिळालं.. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.. संतप्त कोल्हापूरकरांनी अंबानींचा निषेध म्हणून जिओ कार्ड वर बंदी घातली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात हत्तीणीवरून वातावरण तापले आहे. मात्र आता महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरकराना लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
आज महादेव हत्तीणीसंदर्भात (Mahadevi Elephant) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. महादेवी हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आहे आणि त्याचे पालन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, गणेश नाईक, धैर्यशील माने, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोतआणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल – Mahadevi Elephant
34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी तिच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि याबाबत सुप्रीम कोर्टात माहिती दिली जाईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्र्वस्त्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत आणि सरकारची बाजू मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल. वनतारात जशी व्यवस्था आहे तशी सुविधा महाराष्ट्राचे वनखाते आणि शासन उभी करणार आहे. आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला