Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगपूर्व विदर्भासह मराठवाड्यात पावसाचे हायअलर्ट, मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार, IMD चा अंदाज...

पूर्व विदर्भासह मराठवाड्यात पावसाचे हायअलर्ट, मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार, IMD चा अंदाज काय ?

पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून पुढील दोन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.

 

हवामान विभागाने पुढील 4 दिवस विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट दिले आहेत. मोसमी पावसाने राज्यातून गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने कुठे काय अंदाज दिला आहे? पाहूया

 

हवामान विभागाने आज बहुतांश विदर्भात पावसाचे यलो दिले आहेत. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट दिले आहेत. पुढील दोन दिवस पावसाचा जोर पूर्व विदर्भाकडून मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे वाढणार आहे. त्यानंतर बहुतांश राज्यात पावसाची हजेरी राहणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवले आहे.

 

पूर्व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

 

हवामान विभागाने 5 ऑगस्ट रोजी नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीजिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस बहुतांश विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही आज पासून पावसाचा जोर वाढणार असून आज नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली ,परभणी सोलापूर व सांगली जिल्ह्यालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

 

कोणत्या जिल्ह्याला काय इशारा?

 

5 ऑगस्ट: सांगली, सोलापूर, धाराशिव ,लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी ,नागपूर वर्धा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली,

 

6 ऑगस्ट: वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बीड, परभणी, लातूर, हिंगोली ,धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग

 

7 ऑगस्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा ,सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर,सोलापूर, बीड,धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ वर्धा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

 

8 ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी ,पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर, नगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड ,परभणी ,नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला* अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया, गडचिरोली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -