Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगभारताचा दणका! ‘मला याबाबत माहित नाही, चौकशी करेन…’भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका,...

भारताचा दणका! ‘मला याबाबत माहित नाही, चौकशी करेन…’भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, थेट बदलली भाषा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच भारत रशियाकडे कच्चे तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प नाराज आहेत. आता थेट भारतानेच ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांना आरसा दाखवण्याचे काम केले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबतची माहिती घेणार असल्याचे म्हटले.

 

अमेरिका आणि युरोपने रशियाकडून तेल आयात करत असल्याने भारताला टार्गेट केले आहे, पण अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराइड, पॅलेडियम, फर्टिलाइजर्स आणि रसायने आयात करत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला याबाबत माहिती नाहीये, मी चाैकशी करतो. मुळात म्हणजे विदेश मंत्रालयाने मंगळवारी म्हटले होते की, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

 

हेच नाही तर ज्यावेळी हे युद्ध सुरू होते त्यावेळी अमेरिकेनेच भारताला हे तेल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एकप्रकारे ट्रम्प यांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. अमेरिका आपल्या अणुउद्योगासाठी रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराइड आयात करते. मग भारत जर रशियाकडून कच्चे तेल स्वस्त दरात खरेदी करत असेल तर अमेरिकाला का पोटदुखी असावी, असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जातोय.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून भारत कच्चे तेल विकत घेते, यावर भाष्य केले होते. हेच नाही तर त्यांची म्हणणे आहे की, भारत अमेरिकेला अनेक गोष्टी विकतो. पण अमेरिकेकडून काही खरेदी करत नाही. भारताकडून येणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लादला जातो. भारतावर अमेरिकेकडून जास्त कर लावण्यासाठी पाऊसे उचलली जात आहेत. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय भाष्य करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर जास्त कर लावण्याबद्दल भाष्य करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -