शहापुरमधील तुळजाभवानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्वेता दिपक कोळेकर (वय २७) यांचा अपार्टमेंटमध्येच गारमेंट व्यवसाय आहे.
२९ जुलै रोजी रात्री त्यांनी गारमेंटचे शटर लॉक केले होते. ३० जुलै रोजी नेहमीप्रमाणे गारमेंट उघडण्यास गेल्या असता लॉक तोडुन चोरट्यांनी ३५ हजार रुपये किंमतीच्या २ शिलाई मशिन लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कोळेकर यांच्या फिर्यादीनुसार शहापुर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.