Thursday, August 7, 2025
Homeब्रेकिंगलाडकींच्या खात्यात २४ तासात खटाखट १५०० रूपये जमा होणार; मंत्री आदिती तटकरेंची...

लाडकींच्या खात्यात २४ तासात खटाखट १५०० रूपये जमा होणार; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी खात्यात जमा होणार आहे.

 

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालपासून वितरण सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

 

बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी १५ दिवसांत स्पष्ट होणार असून कारवाई होणार आहे.महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. या योजनेला अल्प दिवसांत भरघोस प्रतिसाद मिळालेला होता. दरमहा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यत १ हजार ५०० रूपये जमा होतात. मात्र, जुलै महिना संपला. ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली. अद्याप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता काही जमा झालेला नाही. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? याबाबत माहिती दिली आहे.

 

सध्या राज्यातील लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. या हत्याबाबत आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरूवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला द्यायला सुरूवात होईल. कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे’, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

 

त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आता काहीही टेन्शन घेण्याची गरज अवघ्या काही दिवसांत लाडकी बहीण योजनेतील रक्कम खात्यात जमा होण्यास सुरूवात होईल.

 

बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खास महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ काही बोगस आणि बांगलादेशी लोकांनीही घेतल्याचं आढळून आलं होतं. मात्र, या योजनेचा लाभ काही पुरूषांनीही घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’बोगस लाभार्थ्यांचा डेटा माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं आमच्याकडे दिला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी आम्हाला १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल. जर पुरूषांनी किंवा इतर व्यक्तींनी याचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं तर, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल’, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -