Friday, August 8, 2025
Homeअध्यात्मभद्रा काळात अजिबात बांधू नका राखी, यंदा या शुभ मुहूर्तावर साजरे करा...

भद्रा काळात अजिबात बांधू नका राखी, यंदा या शुभ मुहूर्तावर साजरे करा रक्षाबंधन

रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतुट नात्याचे प्रतीक आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणाऱ्या या सणाला भावाच्या हातावर बांधली जाणारी राखी हा केवळ एक धागा नाही, तर ते प्रेम, संरक्षण आणि विश्वासाचे बंधन आहे.

 

या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि भरभराटीची कामना करते, तर भाऊ तिच्या संरक्षणाचे वचन देतो. मात्र, हा पवित्र सण साजरा करताना शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. कारण भद्रा काळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते.

 

 

भद्रा काळात राखी का बांधू नये?

 

पुराणानुसार, भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. असे मानले जाते की भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे अशुभ परिणाम होतात. लोककथेनुसार, रावणाची बहीण शूर्पणखेने त्याला भद्रा काळातच राखी बांधली होती आणि पुढे रावणाचा नाश झाला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संकटापासून वाचण्यासाठी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी भद्रा मुक्त वेळेतच राखी बांधणे आवश्यक आहे. कारण हा सण केवळ प्रेम व्यक्त करण्याचा नसून तो एकमेकांच्या सुरक्षिततेचा आणि सुखी जीवनाचा संकल्प आहे.

 

 

रक्षाबंधन 2025 कधी आहे?

 

श्रावण पौर्णिमा तिथी सुरू: 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी.

श्रावण पौर्णिमा तिथी समाप्त: 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी.

रक्षाबंधन 2025 ची तारीख: उदय तिथीनुसार रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरे केले जाईल.

रक्षाबंधन 2025 चे शुभ मुहूर्त

 

ब्रह्म मुहूर्त: पहाटे 04:21 ते पहाटे 05:06 पर्यंत.

अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:59 ते दुपारी 12:54 पर्यंत.

सर्वार्थ सिद्ध योग: पहाटे 05:47 ते दुपारी 02:23 पर्यंत.

विजय मुहूर्त: दुपारी 02:23 ते दुपारी 03:23 पर्यंत.

निशीथ काळ: सायंकाळी 05:43 ते सायंकाळी 07:22 पर्यंत.

यंदा भद्रा काळ कधी आहे? (When is Bhadra Kal, Raksha Bandhan 2025 )

 

रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते. बऱ्याचदा राखीच्या सणावर भद्राची सावली असते पण यंदा राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तावर भद्राकाळ नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -