Friday, August 8, 2025
Homeयोजनानोकरीबीसीसीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महत्त्वाच्या पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

बीसीसीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महत्त्वाच्या पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

बीसीसीआयच्या श्रीमंती गवगवा संपूर्ण जगभरात आहे. बीसीसीआयच्या अधिपत्याखाली जगातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलचं आयोजन केलं जातं. इतकंच काय तर बीसीसीआयची आर्थिक स्थितीही जबरदस्त आहे. त्यामुळे बीसीसीआयबाबत कायमच आकर्षण राहिलं आहे. अनेकांना बीसीसीआयसोबत नोकरी करण्याची इच्छा असते. पण कधी जाहीरात निघेल आणि कधी अर्ज करायचा या विवंचेन अनेक जण असतात. तुम्हीही तसाच विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण बीसीसीआयनं बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदांमुळे भारताच्या क्रिकेटच्या कोचिंग स्वरुपात आणि खेळ विज्ञानात बदल करण्यास मदत होणार आहे. यासाठी बीसीसीआयने तीन महत्त्वाच्या पदांसाठी जाहीरात काढली आहे. या भरतीनंतर प्रशिक्षकांना मदत मिळणार आहे. बॅटिंग रेजिडेंट फॅकल्टी, बॉलिंग रेजिडेंट फॅकल्टी आणि खेळ विज्ञान-चिकित्सा या पदासाठी भरती होणार आहे.

 

कोण करू शकतं अर्ज

रेजिडेंट फॅकल्टी फलंदाज या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा प्रथम श्रेणी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असावा. बीसीसीआय लेव्हल-2 किंवा लेव्हल-3 कोचिंग सर्टिफिकेट असेल तर प्राधान्य मिळेल. किमान पाच वर्षांचा कोचिंग अनुभव असावा. डिजिटल आणि कामगिरी चाचणी साधनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

रेजिडेंट फॅकल्टी गोलंदाज या पदासाठी अर्ज करणआऱ्या उमेदवार हा हा प्रथम श्रेणी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असावा. बीसीसीआय लेव्हल-2 किंवा लेव्हल-3 कोचिंग सर्टिफिकेट असेल तर प्राधान्य मिळेल. किमान पाच वर्षांचा कोचिंग अनुभव असावा. यासाठीही डिजिटल आणि कामगिरी चाचणी साधनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

क्रीडा विज्ञान आणि चिकित्सा या पदासाठी क्रीडा विज्ञान किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असावी. त्यांना किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. खेळातील कामगिरी सुधारण्यासाठी काम करण्याचा अनुभवही महत्त्वाचा असेल. खेळाडू विकास आणि वैद्यकशास्त्राचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

अर्ज कसा कराल

वरील तिन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट सायंकाळी 5वाजेपर्यंत आहे. विशेष म्हणजे ही पदे निवासी असून बंगळुरूसाठी आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. सर्व पदांसाठी वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भातील जाहीरात असून त्यावर अर्ज करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -