इंग्लंडमधील कसोटी सीरिजमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या ब्रेकवर आहे. टीमच्या इतर खेळाडूंप्रमाणेच सिराजसुद्धा त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. हा ब्रेक सिराजसह टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अत्यंत चांगल्या वेळी आला आहे. कारण सर्वांनाच कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरं करण्याची संधी मिळाली. सिराजनेही हैदराबादमधील त्याच्या राहत्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. विशेष म्हणजे ज्या मुलीशी त्याच्या प्रेमसंबंधाच्या अफवा पसरू लागल्या होत्या, तिनेच त्याला राखी बांधली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, तब्बल 26 लाख महिलांवर सरकार करणार ही कारवाई
इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिराजने शनिवारी 9 ऑगस्ट रोजी सर्व देशवासीयांप्रमाणेच रक्षाबंधन साजरा केला. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेनं सिराजला राखी बांधली. जनाईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी सिराज आणि जनाई यांच्या अफेअरच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. जनाईच्या वाढदिवसाच्या पार्टीतील या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. सिराज आणि जनाईला त्या फोटोमध्ये पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
सोमवारपासून अतिमुसळधार पाऊस, 11 राज्यांना हायअलर्ट, महाराष्ट्राबाबात मोठी बातमी
आता रक्षाबंधनच्या निमित्त जनाईने सिराजला राखी बांधतानाचा फोटो शेअर करत त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जनाईने सिराजला ‘प्रिय भाऊ’ असं म्हटलंय, तर सिराजनेही तिचा फोटो शेअर करत ‘जनाईसारखी दुसरी कोणती बहीण नाही’ अशा शब्दांत कौतुक केलंय.
View this post on Instagram
सिराजबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या यशात सिराजने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाच कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या होत्या. विशेषत: ओव्हल इथं खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत सिराजने दुसऱ्या डावात पाच विकेट्ससग एकूण 9 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाला 6 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला.
जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थित असते. तर काही पार्ट्यांमध्ये तिला बहीण श्रद्धा कपूरसोबतही पाहिलं गेलंय. जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं आहे.
महिलांसाठी सरकारची नवी योजना!! 100 टक्के अनुदान मिळणार