इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात रविवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मगर दिसून आली. हत्ती चौकातील एकजण पंचगंगा नदीत बुडाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना कळाली.
इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनाचे थकीत अनुदान ताबडतोब द्या
इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनाचे थकीत अनुदान ताबडतोब द्या
त्यानंतर त्यांनी रविवारी दिवसभर त्याची शोधमोहीम राबवत असताना सायंकाळी साडेपाचच्यादरम्यान काळ्या ओढ्याचे पाणी जेथे पंचगंगा नदीत येऊन मिसळते, त्याच्याजवळ असलेल्या बेडक्याळे यांच्या शेताजवळ मगरीचे लहान पिल्लू नदीपात्रात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापनामधील कर्मचाऱ्यांना दिसले.
त्यांनी आपली बोट आणखी पुढे घेतली असता मोठी मगर नदीपात्रालगत बसल्याचे दिसून आले. मगर आढळून आल्याने पंचगंगा नदीपात्रात मगरीचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. या बोटीवर आपत्कालीन यांत्रिक बोटीचे प्रमुख संजय कांबळे, हरीष कांबळे, देवानंद कांबळे, शाक्यानंद कांबळे, शीतल ज्योती, अविनाश काकडे, आदी उपस्थित होते.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात रविवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मगरीचे दर्शन झाले.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात रविवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मगरीचे दर्शन झाले.
पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, चावा घेताच मोठ्या खेळाडूसह दोघांचा मृत्यू, लोकांत भीतीचं वातावरण!