२००५ सालापासून दरवर्षी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पुराची अनामिक भीती मनात वाटत होती. दरवर्षी साधारणपणे २० जुलै ते १० ऑगस्ट या काळात पुराची शक्यता कायम असायची. मात्र, पावसाने उसंत दिली असून नदीचे पाणीदेखील पात्रात गेले आहे. त्यामुळे तूर्ततरी पुराचा धोका टळल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
अंगारकी संकष्टीनिमित्त पंचगंगा वरद विनायक मंदिरात विविध कार्यक्रम
सन १९१४ नंतर २००५ साली सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागले होते. पडणारा पाऊस व धरणातील पाण्याचा विसर्ग तसेच अलमट्टी धरण या अनेक कारणांमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला.
पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, चावा घेताच मोठ्या खेळाडूसह दोघांचा मृत्यू, लोकांत भीतीचं वातावरण!
नदीचे पाणी घरात आल्यामुळे घरातील साहित्याचे होणारे अतोनात नुकसान, घरात पाणी राहिल्यामुळे साठणारी ओल व साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी केलेली धडपड तसेच पूर उतरल्यावर स्वच्छता आणि साहित्य लावणे यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे हाल व्हायचे. २००५ नंतर २०१९ व २०२१ यावेळी पुराचे पाणी पुन्हा एकदा आले. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे शेतीसह आर्थिक नुकसान झाले. सध्या पावसाने उसंत घेतली असून नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हााला तर्त दिलासा मिळाला आहे.