Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्र‘ऑफिसमध्ये टक लावून पाहतात, रात्री व्हिडिओ कॉल आणि..’ महिला अधिकाऱ्यांचा IAS अधिकाऱ्यावर...

‘ऑफिसमध्ये टक लावून पाहतात, रात्री व्हिडिओ कॉल आणि..’ महिला अधिकाऱ्यांचा IAS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलींच्या सुरक्षा आणि त्यांच्या शिक्षण मिळण्यासाठी ‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’ अशी मोहिम राबवत आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात एक असे प्रकरण उघड झाले आहे त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नोएडा येथील काही महिला अधिकाऱ्यांनी आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी थेट पत्रच लिहीले आहे.

 

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे. येथील राज्य कर विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी आपले सिनियर आयएएस अधिकारी संदीप भागिया यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा अधिकारी गेल्या चार महिन्यांपासून नोएडा झोन मध्ये तैनात आहेत. महिला अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की संदीप भागिया त्यांच्यासोबत अनुचित व्यवहार करतात. ज्यामुळे त्या खूप त्रस्त आहेत. हे प्रकरण केवळ महिला अधिकाऱ्यांच्या चिंतेचा विषय नसून प्रशासकीय स्तरावर देखील यास गंभीरपणे घेतले जात आहे.

 

अधिकारी देत आहे धमकी

महिला अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तक्रार करणारे पत्र लिहिले आहे. यात सांगितले आहे की संदीप भागिया महिलांना धमकी देत आहेत आणि अपशब्द वापरत आहेत. ते महिलांना अधिकाऱ्यांना ‘तुम्हाला बर्बाद करु टाकेन’ आणि ‘नोकरीवरुन काढून टाकेन’,’तुमची नोकरी खाऊन टाकेन’. या प्रकारच्या धमक्यांनी महिला अधिकाऱ्यांचे मानसिक रुपाने विचलित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -