डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, ‘या’ दोन दअमेरिकेने काही देशांवर टॅरिफ लादला आहे. हेच नाही तर दबाव टाकून टॅरिफच्या अटी मान्य करून घेण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प याचं सुरू आहे. आता काही देश टॅरिफच्या विरोधात अमेरिकेच्या विरूद्ध एकत्र येताना दिसत आहेत. भारताकडून अनेकांना आशा आहे, कारण अमेरिका एका मागून एक करून सर्वांवर टॅरिफच्या माध्यमातून अन्याय करत आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचे राष्ट्रपती यांच्यासोबतच इतर काही देशाच्या अध्यक्षांचे फोन आले असून यामध्ये महत्वाची चर्चा झाली.
ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डा सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. अमेरिकेने भारतावर टॅरिफ आकारल्यानंतर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्येही फोनवरून संवाद झाला. आता 15 ऑगस्टला पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक आहे. भारताप्रमाणेच अमेरिकेने ब्राझीलवर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ब्राझीलला भारताकडून अपेक्षा आहे की, भारत यामधून काहीतरी मार्ग काढले आणि ट्रम्पची दादागिरी संपवेल.
ब्राझील आणि भारत हे दोन्ही देश ब्रिक्सचे संस्थापक सदस्य आहेत. यामुळे ब्राझीलच्या अपेक्षा भारतावर कायम आहेत. जगातील चाैथ्या नंबरची इकोनॉमी भारत असल्याने भारत काहीतरी पाऊले डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात उचलेल अशी अपेक्षा ब्राझीलसह इतर काही देशांना आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात भारताने कायमच शांततेचा शांततेचा संदेश दिलाय. भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत. यादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेलेंस्कीचा फोन आला.
मुळात म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत अमेरिकेच्या अनेक मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आहेत. भारतातून कमावलेला पैसा हा अमेरिकेत जातो आणि तेथून अर्थव्यवस्थेला मदत होते. जर भारताने या कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली तर अमेरिकेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अशी देखील चर्चा आहे की, भारत हा अमेरिकेच्या विरोधात लवकरच ठोस भूमिका घेईल आणि या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असून काही देशांना भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत.