पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी aai.aero या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. या भरतीसाठी एकूण 976 पदे उपलब्ध आहेत.
या पदांसाठी भरती
कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर) – 11 पदे
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – सिव्हिल) – 199 पदे
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) – 208 पदे
कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) – 31 पदे
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) – 527 पदे
पात्रता
उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 27 वर्षे असावे, वय 27 सप्टेंबर 2025 रोजी मोजले जाईल. राखीव वर्गातील उमेदवारांना वयमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांकडे आर्किटेक्चर किंवा संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी अथवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड GATE गुणांवरून केली जाईल.
पगार
कनिष्ठ कार्यकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 40,000 ते 140,000 रुपये (3% वाढीसह) पगार मिळेल.
अर्ज शुल्क
अर्जासाठी 300 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र महिला, अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक आणि एएआयमध्ये एक वर्ष प्रशिक्षण घेतलेले उमेदवार शुल्क माफ असतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट aai.aero वर भेट द्यावी.
होमपेजवर दिलेल्या अर्ज लिंकवर क्लिक करा.
स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा.
अर्ज भरा आणि तपासणी करा.
शुल्क भरा (ज्यांना लागू असेल).
अर्जाची प्रिंटआउट घेऊन सांभाळून ठेवा.