सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोन्याचे दर 1 लाखांच्या पार गेले आहेत. जर तुम्ही सोने खरेदीचं नियोजन करत साल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी अपडेट आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 24 कॅरेट सोन्याचे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील एका तोळ्याचे दर 1900 रुपयांनी घटले आहेत. फक्त वायदेबाजारच नव्हे तर देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी सोने दरात तेजी पाहायला मिळाली होती आता त्याला ब्रेक लागला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्याचा दर पाहिला असता 3 ऑक्टोबरला संपणाऱ्या वायद्याच्या सोन्याच्या दरांबाबत आढावा घेतल्यास आठवड्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वा पाहायला मिळाली. 999 शुद्धा असणाऱ्या सोन्याचा 8ऑगस्टचा दर101798 रुपये होता. तो या शुक्रवारी 99850 रुपयांवर आला आहे. यानुसार एमसीएक्सवर सोन्याचा दर 1948 रुपयांनी घटला आहे.
देशांतर्गत सराफा बाजारातील सोन्याचे दर पाहिले असता त्यात देखील घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईनुसार 8 ऑगस्टला सोन्याचा दर 101406 रुपये इतका होता. जो त्याच दिवशी शुक्रवारपर्यंत 100942 रुपयांवर आला आहे.या शुक्रवारी सोन्याचे दर 100023 रुपयांवर आळा आहे. म्हणजेच सोन्याचा दर 919 रुपयांनी घटला आहे. देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्यानं सोन्याचे दर 1 लाखांच्या पार आहेत.
24 कॅरेट सोने : 1,00,023 रुपये/10 ग्रॅम
22 कॅरेट सोने : 97,620 रुपये/10 ग्रॅम
20 कॅरेट सोने : 89,020 रुपये/10 ग्रॅम
18 कॅरेट सोने : 81,020 रुपये/10 ग्रॅम
14 कैरेट सोने : 64,510 रुपये/10 ग्रॅम
दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर दिले जाणारे सोन्याचे दर देशभरात सर्वत्र सारखे असतात. मात्र, वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात 3 टक्के जीएसटीसह आणि मेकिंग चार्जसह किंमत वाढते. मेकिंग चार्ज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो.