आजकालच्या अनिश्चितेच्या वातावरणात बचत करण्यासाठी सर्वांची सर कारी योजनांना पसंती आहे. त्यामुळे कमाईचा काही हिस्सा लोक अशा ठिकाणी लावू इच्छीत आहेत, जेथे पैसे सुरक्षित राहातील आणि परतावा देखील चांगला मिळेल. अशावेळी पोस्ट ऑफीसच्या टाईम डिपॉझिट स्किम अशा वेळी चांगला पर्याय म्हणून पाहिल्या जातात. यात गुंतवणूक केल्यानंतर तुमचा पैसाही सुरक्षित राहतो आणि तुम्हाला 7.5% टक्क्यांपर्यंत व्याजही मिळते.
खास बाब म्हणजे या स्कीममध्ये पाच वर्षांच्या गुंतवणूकीवर तुम्हाला केवळ व्याजातूनच 2 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. चला संपूर्ण कॅल्युलेशन पाहूयात…
पोस्ट ऑफीसची टाईम डिपॉझिट स्कीम,का आहे खास ?
पोस्ट ऑफीसच्या या योजनेचा फायदा लहान मुले, तरुण वा बुजुर्ग अशा सर्वांना होऊ शकतो. यात तुम्ही किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. आणि आपल्या सुविधेनुसार 1 वर्ष, 2 वर्ष,3 वर्ष किंवा 5 वर्षांसाठी पैसे जमा करु शकता. जेवढा गुंतवणूकीचा कालावधी मोठा असेल तेवढा व्याजाचा दरही चांगला मिळतो.
2 लाख रुपयांचे व्याज कसे मिळणार ?
जर कोणा गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये या योजनेत लावले कर तर त्याला 7.5% व्याजाच्या हिशेबाने 5 वर्षात सुमारे 2,24,974 रुपये केवळ व्याजाच्या रुपात मिळतील. याचा अर्थ केवळ व्याजातून तुम्हाला 2 लाख रुपयांहून जास्त कमाई करता येईल. मुळ रक्कम जोडून तुमची ही रक्कम 7,24,974 रुपये होईल.
कालावधीनुसार मिळणार व्याजाचे पैसे
या योजनेत 1 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 6.9% टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही 2 वा 3 वर्षांसाठी या योजनेत पैसे लावाल तर तो व्याजदर 7% होईल. परंतू तुम्ही जर पाच वर्षांसाठी गुंतवणूक कराल कर गुंतवणूकीवर तुम्हाला सर्वाधिक फायदा मिळेल आणि तुम्हाला 7.5% व्याजदराचा लाभ होईल.
टॅक्समधून सुट मिळाल्याचा फायदा
या स्कीममध्ये एक आणखी खास बाब म्हणजे यात गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सुट मिळते. इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत तुम्ही तुमच्या गुंतवणूकीच्या रक्कमेवर देखील सुट मिळवू शकता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या टॅक्सची बचत करू शकता आणि पैसा देखील वाढवू शकता.