Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यभरातील ZP महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ, आता वसुली होणार, किती...

राज्यभरातील ZP महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ, आता वसुली होणार, किती जणींनी पैसे लाटले?

विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे .आधी सरसकट मंजूरी आणि खात्यावर जमा होणाऱ्या लाभामुळे लक्षवेधी ठरणारी लाडकी बहीण योजना पडताळणीच्या फेरीत आणि नंतर अपात्र बहिणींच्या याद्यांमध्ये अडकली . निवडणुकांपूर्वी सरसकट महिलांना लाभ देणारे सरकार आता महिलांची गळती करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत . लाडकी बहीण योजनेवरून राज्यभरात गदारोळ पाहायला मिळत असताना आता राज्यभरात 1183 जिल्हा परिषद (ZP)कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे . बुलढाण्यात ही संख्या सर्वाधिक असून सोलापूर धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांमध्येही महिला कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे .

 

एका घरामध्ये दोन पेक्षा अधिक महिलांना लाडके बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही .मात्र दोन पेक्षाही अधिक महिलांनी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची यादी सरकारने तयार केल्या आहेत .त्यानुसार तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केली असून या महिलांची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे . यात आता जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या एक हजाराहून अधिक महिलांचा समावेश असल्याचं उघडकीस आलंय . लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या 2 कोटी 29 लाख महिलांना लाभ मिळत आहे. मात्र, एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांची छाननीचा निकष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत. तर, जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनाही आता योजनेतून वगळण्यात येईल.

 

कोणत्या जिल्ह्यात लाभार्थी ZP कर्मचाऱ्यांची काय संख्या

लाडकी बहीण योजनेचा जिल्हा परिषदेतील सरकारी कर्मचारी घेत आहेत कोणत्या जिल्ह्यात किती कर्मचारी लाभ घेत आहेत याची माहिती खालील प्रमाणे

 

कर्मचारी संख्या जिल्हे

193 बुलढाणा

150 सोलापूर

147 लातूर

145 बीड

110 उस्मानाबाद

76 जालना

56 वाशिम

54 पुणे

24 कोल्हापूर

17 सांगली, अहमदनगर

11 नागपूर

10 अमरावती

9 छत्रपती संभाजीनगर, नाशिक

8 सातारा, नांदेड, नंदुरबार

7 जळगाव, गोंदिया

5 चंद्रपूर, धुळे, भंडारा

3 परभणी

2 गडचिरोली, यवतमाळ, ठाणे,

यवतमाळ, ठाणे, हिंगोली

1 अकोला, सिंधुदुर्ग, मुंबई, रत्नागिरी

ज्या लाभार्थ्यांचा जिल्हा समजला नाही असे लाभार्थी 36 आहेत.

 

महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

शासकीय सेवेत असणाऱ्या राज्यातील ११८३ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या १४५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आढळून आला आहे. आणि याच महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अमलात आणली. राज्यातील लाखो महिलांना याचा मोठा फायदा झाल्याच देखील समोर आले.. आर्थिक निकषावर आणि अटीवर महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.. परंतु शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील प्रशासनाची दिशाभूल करत या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल आहे. याबाबतचे पत्र बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून त्यानुसार संबंधित महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सिओंनी दिली आहे..

 

धाराशिव जिल्ह्यात 108 ZP कर्मचारी

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या 108 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अनिता माळी या धाराशिव जिल्हा परिषदेत पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागल्या आहेत. शिक्षण विभागात शिपाई असलेल्या अनिता माळी यांनी योजनेसाठी अर्ज केल्याची कबुली दिली. लाडकी बहीण योजनेसाठी मुलीने अर्ज केला. त्यावेळी नियम आणि अटी माहित नव्हत्या. बँकेत किती हप्ते जमा झाले तेही मी पाहिलेलं नाहीये. पैसे परत करण्याची प्रक्रिया मला माहित नाही. योजनेचे जमा झालेले पैसे परत करण्याची माझी तयारी आहे त्याबाबत माहिती झाल्यास मी पैसे परत करणार असल्याचं त्यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -