Monday, August 25, 2025
Homeब्रेकिंगभारताकडून अमेरिकेला मोठा झटका, गंभीर आरोप, भारतीय तेल कंपन्या जगात…

भारताकडून अमेरिकेला मोठा झटका, गंभीर आरोप, भारतीय तेल कंपन्या जगात…

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, म्हणून अमेरिका विविध प्रकारे दबाव टाकत आहे. अमेरिकेच्या दबावास उत्तर देत भारताने स्पष्ट केले की, आमची मर्जी की, आम्ही तेल खरेदी नेमके कोणाकडून करायचे. याबद्दल आता रशियाचे भारतीय राजदूत विनय कुमार यांनी मोठे भाष्य केले आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले. विनय कुमार यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या तणावात मोठे भाष्य केले.

 

विनय कुमार यांनी मुलाखतीत म्हटले की, भारत आपल्या 1.4 अरब लोकांच्या हिताचे निर्णय घेतो. अमेरिकेने भारतावर जरी 50 टक्के टॅरिफ लावले असले तरीही भारत आपल्या देशाच्या हिताचेच निर्णय घेईल. रशियाच्या तेलामुळे अमेरिकेने आमच्यावर लावलेला टॅरिफ हा पूर्णपणे चुकीचा, अविवेकपूर्ण आणि चुकीचा निर्णय आहे. भारतीय तेल कंपन्यांना जगात योग्य ठिकाणी वाटेल तिथे ते तेलाचे व्यापार करू शकतात.

 

मुळात म्हणजे रशिया आणि भारतामधील व्यापार हा समजदारी आणि लोकांच्या चांगल्या भावनांवर सुरू आहे. हेच नाही तर अमेरिका एकीकडे भारतावर टॅरिफ लावते तर रशिया आणि चीन यांच्यावर नाही. यावरून त्यांची चुकीची आणि दुटप्पी भूमिका स्पष्टपणे दिसत आहे. अमेरिकेचा भारतासोबतच्या व्यवहार पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले. भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या अटी अजून मान्य केल्या नाहीत. मात्र, अमेरिकेकडून धमकावले जात आहे. अमेरिकेच्या धमक्यांना गांर्भियाने घेण्यास त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

 

रशियाकडून सर्वात जास्त कच्चे तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, अमेरिकेने कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा चीनवर लावला नाही. हेच नाही तर अमेरिका देखील स्वत: चीनकडे तेल खरेदी करते. मात्र, त्यांना समस्या फक्त भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याचीच आहे. हेच नाही तर भारतावर गंभीर आरोप करत अमेरिकेने म्हटले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध भारतामुळेच सुरू आहे. कच्चे तेल खरेदी करून भारत रशियाला मोठ्या प्रमाणात पैसा देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -