Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रया तारखेला पतंजली गुंतवणूकदारांचा डबल फायदा करणार, केली मोठी घोषणा

या तारखेला पतंजली गुंतवणूकदारांचा डबल फायदा करणार, केली मोठी घोषणा

देशातील प्रसिद्ध एफएमसीजी कंपनी पतंजली दिवाळीच्या आधी आपल्या शेअर होल्डर्सना बंपर गिफ्ट देणार आहे.कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवप 2 शेअर बोनस देणार आहे. ज्याच्यासाठी रेकॉर्ड डेटची घोषणा देखील झाली आहे.बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडने बोनस शेअरच्या वाटपाची 11 सप्टेंबर ही तारीख निवडली आहे.

 

पतंजली फूड्स लिमिटेड कंपनी आता बीएसईवर लिस्टेड आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की 2 रुपयांची फेस व्हॅल्यूवाल्या एका स्टॉकवर गुंतवणूकदारांना 2 शेअर बोनस दिले जाणार आहेत. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये निश्चित केली आहे.जी 11 सप्टेंबर 2025 आहे.

 

तसेच बोनस शेअर देण्याआधी कंपनी डिव्हीडेंड देखील देत आहे. पतंजली त्यासाठी 3 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी 1 शेअरवर 2 रुपयांचा डिविडेंट देखील देत आहे. याआधी कंपनी गुंतवणूकदारांना साल 2024 मध्ये 2 वेळा डिव्हीडेंड दिला होता. आधी 8 रुपयांचा आणि दुसऱ्यांदा 14 रुपयांचा डिव्हीडेंड ऑफर केला होता.

 

कंपनीचा निकाल

पतंजली फूड्स लिमिटेडने जूनच्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. कंपनी एकूण 8,899.70 कोटी रुपयांचा महसुल कमावला आहे. जो गेल्यावर्षी याच तिमाहीच्या 7,177.17 कोटीहून खूप जास्त आहे. कंपनीचे ग्रॉस प्रॉफिट 1,259.19 कोटी रुपये झाले. ते गेल्यावर्षीपेक्षा 23.81% वाढले. टॅक्सनंतरचे प्रॉफिट (PAT) 180.39 कोटी रुपये आले, ज्याचे मार्जिन 2.02% आहे.

 

सेगमेंटमधून कमाई

फूड आणि अन्य FMCG प्रोडक्ट्समधून 1,660.67 कोटी रुपये.

 

होम आणि पर्सनल केअरमधून 639.02 कोटी रुपये.

 

खाद्य तेलातून 6,685.86 कोटी रुपयांचा महसूल जमा

 

कंपनीच्या शेअरची कामगिरी

गेल्या कामकाजाच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. मार्केटच्या प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 693.86 अंकांनी 81,306.85 वर बंद झाला होता. निर्देशांकात मोठी कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्री झाली. ज्याचा परिणाम पतंजली फूड्सच्या लिमिटेड शेअरवर पाहायला मिळाला. पतंजलीचे शेअर 0.47 किरकोळ घसरणीनंतर 1804.05 रुपयांवर बंद झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -