ग्लोबल डिजिटल क्लस्टर कॉइन (जीडीसीसी) व व्हीडीटीटी करन्सीमध्ये पैसे गुंतवून ज्यादा परतीचे आमिष दाखवून तब्बल सात कोटी ८२ लाख ७० हजार ६७० रुपयांची फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित पांडुरंग भोई, दशरथ भोई, विद्या भोई, रमेश उत्तेकर आदीवर तातडीने कारवाई करावी अशी लेखी तक्रार फसवणूक झालेले गणेश बळूलगिड, मारुती काळगी, लक्ष्मीकांत काणे यांच्यासह बाराजणांनी पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये, फसवणूक झालेल्या व्यक्तींना मोठे आमिष दाखवत क्रिप्टो करसीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कमी कालावधीत जादा परताव्याचे अमिष दाखवले. मात्र, गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा न देता संबंधित संशयितानी गुंतवणूक केलेली र कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या मंडळींनी आपले फसवणूक केल्याचे लक्षात येताब पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ओमकार पांडुरंग भोई, व्यंकटेश दशरथ भोई, इरफान मोईद्दीन सय्यद, अमोद बसंत म्हेतर, अजय मधुकर गायकवाड आदीवर कारवाई करण्यात आली. मात्र संगणमत करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेली मुख्य संशयित ऐशोआरामात रहात आहेत. तर फसवणूक झालेले अनेकजण देशोधडीला लागले आहेत. तेव्हा फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयीतावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.