धरण क्षेत्रासह सर्वत्रच पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचगंगेची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मंगळवारी सांयकाळी पाण्याची पातळी ५८.६ फुटावर आली होती. त्यामुळे नदीघाटावरील पंचगंगा वरदविनायक मंदिरासह महादेव मंदिर, रेणुका मंदिर इतर मंदिर दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. तर स्मशानभुमीची स्वच्छता करून उद्या मंगळवारपासून खुले होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडयात धरणक्षेत्रासह सर्वत्र जोरदार चंटींग केल्याने विविध धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तसेच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढच होत गेली. पंचगंगेची इशारा पातळी ओलांडून ६८.४ फुटावर स्थिरावली होती, मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने उसंती घेतल्याने नदीच्या पातळीत कमालीची घट झाली. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने उद्या बंद असलेली जुना पुलावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.