Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रबोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, ६८० शिक्षकांना अटक होणार?

बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, ६८० शिक्षकांना अटक होणार?

बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सायबर पोलिसांकडून आतापर्यंत तपासलेल्या १ हजार ८० आयडीमधून ६८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

या ६८० बोगस शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे संकेत एसआयटीकडून मिळाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.

 

नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ५ महिन्यांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहेत. उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने विभागातील २३३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचा अहवाल सादर केला होता. त्या आधारेच सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. १२ मार्चला सायबर पोलिसांकडे या प्रकरणात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक एकाची नावं समोर येऊ लागली.

 

सायबर पोलिसांनी केलेल्या तपासातून नागपूर विभागातील एकूण शिक्षकांपैकी १ हजार ८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून या सर्व शिक्षकांची चौकशी सुरू करण्यात आली. शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला पोलिसांनी अटक केली. पण या प्रकरणातील आरोपी माजी उपसंचालक सतीश मेंढे अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

सतीश मेंढेला अटक करण्याबाबत पोलिसांकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते. तिन्ही न्यायालयांनी सतीश मेंढेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. असे असताना देखील त्याला अटक होत नसल्यामुळे अटकेबाबत शाशंकता व्यक्त होत आहे. या प्ररणाच्या तपासातून ६३३ शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या प्रकरणाचा तपास करत असताना गेल्या पाच महिन्यांत पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी, शिक्षणाधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकांना अटक केली. पण अद्यापही शिक्षकांवरील संकट संपलेले नाही. आर्थिक व्यवहार करत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने शिक्षक म्हणून नियुक्त दर्शवत अधिकाऱ्यांच्या मदतीने ६८० शिक्षकांनी शालार्थ आयडी मिळवल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या सर्वच शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -