Wednesday, August 27, 2025
Homeतंत्रज्ञानजिओचा ‘हा’ धमाकेदार प्रीपेड प्लॅन;नेटफ्लिक्स-अमेझॉन प्राईमचा मोफत आनंद

जिओचा ‘हा’ धमाकेदार प्रीपेड प्लॅन;नेटफ्लिक्स-अमेझॉन प्राईमचा मोफत आनंद

रिलायन्स जिओ हे भारतीय टेलिकॉम मार्केटमधील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध कंपनी आहे. लाखो वापरकर्त्यांसाठी जिओ नवीन ऑफर आणि प्लॅन लाँच करत राहते. अशातच जिओ कंपनी वापरकर्त्यांच्या सुविधा लक्षात घेऊन त्यांचा गरजेप्रमाणे देखील अनेक प्लॅन लॉंच करत असते. त्यातील असे काही प्लॅन आहेत जे विशेषतः अशा लोकांना आवडतात ज्यांना केवळ कॉलिंग आणि डेटाच नाही तर मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असतो. अशातच जिओकडे उत्तम रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत.

 

कंपनीने तीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत ज्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम सारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळत आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण या प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

 

जिओच्या 1,029 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राइम लाइट सबस्क्रिप्शन मिळते. जे 84 दिवसांच्या वैधतेसह येते. याशिवाय तुम्हाला 2 जीबी हाय-स्पीड डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.

 

हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. डेटा आणि कॉलिंग फायद्यांसोबतच तुम्हाला 84 दिवसांसाठी Amazon Prime Lite चा फायदा देखील पूर्णपणे मोफत मिळत आहे.

 

जिओचा नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन

 

जिओच्या 1,299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शन मिळत आहे. हे सबस्क्रिप्शन तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह मिळते. तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता. तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.

 

या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त नेटफ्लिक्सच नाही तर इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळत आहेत. ज्यामध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शनसह JioHotstar मोबाईल अॅक्सेस उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर नेटफ्लिक्सचा आनंद घेऊ शकता.

 

जिओचा नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन

 

जिओच्या 1,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शनचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्येही तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळते. तुम्हाला दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्याची संधी मिळते. तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. यामध्ये तुम्हाला 90 दिवसांच्या वैधतेसह नेटफ्लिक्स बेसिक, जिओहॉटस्टार टीव्हीचा अॅक्सेस मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -