गोकुळ शिरगाव येथील कारखान्यात काम करणाऱ्या एका युवकाने कळंवा परिसरातील शेतात आंब्याच्या झाडाला गळफास देत जीवनयात्रा संपवली.
सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. मृत युवकाचे नाव साहिल साताप्पा जाधव (वय १९, मूळ गाव वाघापूर ता. भुदरगड, सध्या रा. खडकेवाडा ता. कागल) असे आहे. साहिलने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तो गोकुळ शिरगाव येथील कारखान्यात नोकरी करत होता. या प्रकरणाची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.