आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगाचे अर्थसहाय्य वाढवण्यात आले आहे.
या योजनेत आता १ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. आता त्यांच्या खात्यावर २५०० रुपये येणार आहे.
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या निधीत वाढ
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेत आता लाभार्थ्यांना प्रत्येकी २५०० रुपये मिळणार आहेत. याआधी योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रुपये देण्यात येत आहे. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहे.
संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana)
संजय गांधी निराधार योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत राज्यातील महिला, मागासवर्गीय समूदाय, आदिवासी आणि दुर्बल घटकांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जायचे. आता या योजनेच्या दिव्यांगांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे.
श्रावणबाळ योजना (Shravanbal Yojana)
श्रावणबाळ योजनेतदेखील लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने याआधीही अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्र सरकारने वर्षभरापूर्वी लाडकी बहीण योजना राबवली होती. मात्र, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत नव्हता. आता संजय गांधी निराधार योजनेच्या निधीत वाढ झाल्याने आता अनेक महिला पुन्हा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे.