Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्र4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा

4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती.आता पुढचे तीन दिवस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. फक्त महाराष्ट्राच नाही तर देशभरात पावसाने धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशभरात पाऊस कोसळतोय. देशातील अनेक भागात पूर आले असून नद्यांनी धोकादायक स्थिती ओलांडली आहे.

 

हवामान तज्ज्ञांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हांना मुळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मात्र, आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्य स्वरूपाच्या पावसाचा अंदात वर्तवण्यात आलाय. उद्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. उद्या आणि परवा राज्यासह देशात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

 

बाकी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झालंय. शेतकरी राजा चिंतेत आहे. राज्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. देशात पावसाचे संकट आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. जायकवाडी धरणातून दोन महिन्यात 25 टीएमसी विसर्ग, आतापर्यंत 3 वेळा पाणी सोडण्यात आले. धरण क्षेत्रात पाण्याची सातत्याने आवक असल्याने सद्यस्थितीला धरणाचा साठा 99% वर गेलीये.

 

पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिक वसाहतींची चिंता मिटली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळा संपण्यापूर्वीच शंभर टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात तीन वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नांदेडमध्ये दोन वेळा गोदावरी नदीला पूर देखील आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -