Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्रसावधान! कर न भरल्यास रोज 100 रुपये दंड; 'या' वाहनधारकांबाबत RTOचा मोठा...

सावधान! कर न भरल्यास रोज 100 रुपये दंड; ‘या’ वाहनधारकांबाबत RTOचा मोठा निर्णय

भारत (बीएच) मालिकेमध्ये वाहने नोंदणीकृत करण्यासाठी दोन वर्षांसाठी कर घेतला जातो. त्यानंतर पुन्हा नव्याने वाहनांचा कर भरावा लागतो. तो कर न भरल्यास वैध असल्याच्या कालावधीपासून सात दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो.

 

एक वर्षे कर न भरल्यास दंडाची रक्कम ३६ हजार रुपये होते. मग ते वाहन कोणतेही असो. त्यामुळे बीएच मालिकेच्या वाहनचालकांनी वेळेत कर भरावा,’ असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले.

 

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरीत (व्हेकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करण्याचे टाळण्यासाठी २०२१मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने बीएच सीरीज सुरू केली होती.

 

मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते; परंतु वाहन मालकाकडे ‘बीएच नंबर सीरीज’ असेल, तर त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही. तो या सीरीजवर देशातील कोणत्याही राज्यात किंवा राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बिनदिक्कतपणे प्रवास करू शकतो. पुण्यात केंद्र सरकारची कार्यालये, लष्करी आस्थापना, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ‘बीएच’ मालिकेतील वाहने घेण्याचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात महिन्याला साधारण ५०० ते ६०० वाहनांची ‘बीएच’ मालिकेत नोंदणी होत आहे.

 

कोण घेऊ शकतो ‘बीएच सीरीज’

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सध्या तरी ‘बीएच सीरीज’ची सुविधा संरक्षण विभागाचे कर्मचारी, केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे; तसेच राज्य सरकार, केंद्र सरकार, संरक्षण, खासगी संस्थांशी जोडलेले कर्मचारी आणि ज्यांचे कार्यालय चारपेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत, त्यांना ‘बीएच सीरीज’च्या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो; पण या विभागाच्या कर्मचाऱ्यांना ‘बीएच सीरीज’चा क्रमांक घेणे बंधनकारक नाही.

 

‘बीएच’ मालिकेतील वाहनांसाठी दोन वर्षांसाठी कर घेतला जातो. दोन वर्षांनंतर पुन्हा कर भरावा लागतो. तो न भरल्यास आधीच्या कराची मुदत संपल्यानंतरच्या सात दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे ‘बीएच’ मालिकेमध्ये नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा कर वेळेत भरून वाहन मालकांनी दंड टाळावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -