Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय..

लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात राज्यसरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. योजने अंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

 

महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात अपात्र लाभार्थ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी शासनस्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे. या पडताळणीत अनेक अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे. यानंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दिले जाणारा योजनेचा लाभ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येनी लाभार्थी अपात्र ठरविण्यात आल्याने, नाराजीचा सूर होता. आता मात्र अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा पैकी राज्य स्तरावर करण्यात आलेल्या छाननी मध्ये अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. महिला व बाल विकास विभागाकडून फेरपडताळणीचे काम सुरू करण्यात आले असून, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी पडताळणीस प्रतिसाद द्यावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

लाडकी बहिण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ देणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. लाभ थांबविण्यात आलेल्या लाभार्थ्यां मध्ये आधारकार्डप्रमाणे २१ वर्षे वयापेक्षा कमी अथवा ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. या शिवाय रेशनकार्डनुसार ज्या कुटूंबात दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे अशा कुटूंबात महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे. सबंधित लाभार्थ्यांचे या संदर्भात तसेच कुटूंबात 2 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची महिला व बालविकास विभागाकडून पडताळणी सुरु आहे. या पडताळणीनंतर जे लाभार्थी पात्र असतील त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. करिता ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत मिळणारा लाभतात्पुरता बंद झाला आहे, अशा महिला लाभार्थी यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी सपंर्क करावा, असे आवाहन रायगडच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड श्रीकांत रुक्मिणी ज्ञानोबा हावळे यांनी केले आहे.

 

अपात्रतेचे निकष कोणते…..

 

ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम,मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -